Friday, January 24, 2020

History Puntamba पुणतांबा चा इतिहास puntamba

History of puntamba
 पुणतांबा च्या प्राचीन इतिहास
.
एक गाव मनात घर करून राहोते  'ग्लोबल' युगातले हे गाव काळाच्या ओघात आपल्या पाऊलखुणा जपत आहे. होय, मी दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पुणतांबा ( ता.राहत जि.नगर) या गावाविषयी बोलतोय!

आपलाच पुणतांबा ग्रामस्थ या फेसबुक अकाउंट वर गावविषयी माहिती तसेच गावातील असंख्य  अश्याया मंदिराचे बांधकाम पोटो आहेhttps://www.facebook.com/punyastambh/

. https://m.facebook.com/story.php?story_fbid=208145720186614&id=100029735630310
अलीकडच्या काळात शेतकरी आंदोलनामुळे हे गाव प्रसिध्द पावले. माध्यमांतून या गावातल्या शेतकरी संपाविषयी, आंदोलनाविषयी बातम्या वाचायला मिळत होत्या.
 या गावात जाता येईल, असे वाटले नव्हते. जेव्हा या गावात उतरलो तेव्हा इथला शेतकरी कसा असेल? पीक-पाणी कसे असेल याविषयी मनात प्रश्न उभे राहिले. पण आंदोलनाविषयी कोणी बोलत नव्हते. शेती हा इथला मुख्य व्यवसाय आहे. रेल्वे मार्गावर हे गाव असल्याने दळणवळणाची उत्तम सोय आहे. गावाच्या अंतरंगात शिरू लागलो. तेव्हा पडझड झालेल्या तटबंदी दिसू लागल्या.

संपूर्ण गावातली विविध प्रकारच्या मंदिरे यांची दृश्य आपल्या साठी बनविला आहे
 संपूर्ण पुणतांबा गावाला तटबंदी आहे. ठिकठिकाणी वेशी दिसू लागल्या. या तटबंदी,वेशी आपल्या जुन्या आठवणी सांगत होत्या. अकरा वेशीने बनलेले हे गाव असल्याचे एका गावकऱ्याने सांगितले. माझ्या नजरतले असे हे पहिलेच गाव. गोदातरी वसलेल्या या गावाची कहाणी मला अधिक भावत गेली. मनात घर करत राहिली. बालकवींनी शब्दबध्द केलेल्या 'औदुंबर' कवितेची आठवण झाली. हिरवेगार शेतमळे, नागमोडी वळणे घेत घाट, मंदिराकडे जाणारी गोदामाईची पायवाट पाहताना मनात चैतन्य खळाखळते.  काळाश्या डोहात पाय ठेवताना मन पवित्र होते. गोदामाईचे पाणी गोड आहे. या गोडव्यामुळे या गावाला वैभव प्राप्त झाले असावे.
. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या सरहद्दीवर आणि गोदातीरावर हे गाव वसले आहे. विशेष म्हणजे या गावाला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. एकेकाळी राजा विक्रमादित्य यांची राजधानीचे हे गाव होते. अशी मौखिक माहिती मिळते.
चांगदेव महाराजांची समाधी मंदिर,  पुणतांब्याचा उल्लेख महाराष्ट्रातील महत्त्वाच्या धार्मिक क्षेत्रांत होतो. त्या गावाचे नाव पुण्यस्तंभ अथवा नगर असे होते. ती राजा विक्रमादित्याची राजधानी. पुणतांबा गावाला पूर्ण तटबंदी असून गावाला अकरा वेशी आहेत. बऱ्याच ठिकाणी तटबंदी ढासळली आहे. विक्रमादित्य राजाने त्याच्या जीवनातील महत्त्वपूर्ण कालखंड पुणतांबा येथे व्यतीत केला. महायोगी चांगदेव महाराजांची समाधी तेथे आहे. त्याला त्याच्या विद्वत्तेचा व तपसामर्थ्याचा गर्व झाल्याने ते ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीस गेले व तेथे गर्वहरण होऊन परतले. ती कथा प्रसिद्ध आहे. चांगदेव महाराजांनी ज्ञानदेवांची धाकटी बहीण मुक्ताईला गुरू केले. त्यांनी चौदाशे वर्षें घोर तपःश्चर्या केल्यानंतर माघ वद्य ३ शके १२९८ रोजी पुणतांबा येथे संजीवन समाधी घेतली.   वैदिक काळात पुणतांबा येथे गोदावरीकाठी ऋषिमुनी तप:श्चर्या करत व मोक्षप्राप्तीसाठी पुणतांबेगावी वास्तव्य करत. पुरातनकाळी ते गाव धार्मिक विधी करण्यासाठी विख्यात होते. गावात बहुतांश वस्ती ब्राह्मणांची होती. गावातील बहुतांश वाडे ब्राह्मणांचेच आहेत. पुण्यप्राप्ती व मोक्षप्राप्ती यासाठी काशीनंतर पुणतांबा हे एकमेव महत्त्वपूर्ण ठिकाण मानले जाई. पुणतांबा येथे गोदावरी दक्षिणवाहिनी होते. अंत्यविधीनंतरचे धार्मिक कार्यक्रम तेथे मोठ्या प्रमाणावर होतात. महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींचेही पुणतांबा गावी काही काळ वास्तव्य होते. स्वामींच्या अनुयायांनी गोदाकाठी चक्रधर स्वामींचे भव्य मंदिर बांधले आहे. साईबाबांनीही पुणतांबा गावी बराच काळ वास्तव्य केले. पुणतांब्याचे धार्मिक महत्त्व ओळखून दोनशे वर्षांपूर्वी सद्गुरू गंगागीर महाराज आषाढी एकादशी व महाशिवरात्र या दोन दिवशी पुणतांबा येथे जात. तेथूनच त्यांच्या नामसप्ताहाचा आरंभ झाला. पुणतांबा येथूनच नामसप्ताहाचे आयोजन करणाऱ्या गावाचे नाव जाहीर करण्याची व त्यांना रीतसर नारळ देण्याची परंपरा सुरू आहे.
कार्तिक स्वामी मंदिर,
                            मामा-भाच्याचे मंदिर,


खंडोबा मंदिर,

श्री काळ भैरव नाथ महाराज मंदिर यात्रा महोत्सव साजरा केला जातो ती काही विडिओ

कालभैरव मंदिर https://youtu.be/52G5xndaBO4

                      https://youtu.be/RN79csRV7Yo
    तसेच  चैत्र शुद्ध महिन्यात गुडीपाडवा च्या सुमारे पाच दिवस नंतर

 
बोकटे येथील स्वारी दरम्यान 



काळ भैरव मंदिर श्री राम गल्ली  पुणतांबा येथे भैरव नाथ महाराज पूजा केली जाते व तसेच त्या प्रसंगी काठ्या कवड्या  याना नवीन आभूषण गावातील समाजातील लोक करत असतात
या सर्व पूजेचा मान व गादिवरच मॅन श्री चंद्रकांत बाबा जाधव यांना आहे
पहिली यात्रा गावातून पुराण गाव ता वैजापूर जिल्हा औरंगाबाद
नंतर रामपूरवाडी ,नापावडी ता राहता जिल्हा नगर
गोंधवांनी ता श्रीरामपूर जिल्हा नगर
नंतर       श्री क्षेत्र बोकटे ला प्रस्थान

श्री क्षेत्र बोकटे  ता येवला लिहा नाशिक  जाते
बोकटे ला जाण्या साठी रात्री चंद्र माथ्यावर आल्यावर श्री कल भैरव नाथ मंदिर श्री राम गल्ली तुन गावातील टेंशन रोड मारुती मंदिर या ठिकाणी जाऊन विश्राम घेतला जातो जसा चंद्र मध्यावर आला की बाबा त्यांच्या सांग। प्रथम डफकरी ववाजण्याचा मान भोईर, कळणं,या समजतील लोकांना आहे
 गगे नंतर कावड्या च्या मान माळी समजतील लोकांना आहे त्यात जेजुरकर, घोडेकर,बनकर,डोखे,आनाप, शिंदे अश्या लोकांना आहे
नंतर घोडीवर बाबा घोडी धरण्याचा  मान गावातील न्हावी  समजला। त्यात सद्हेह्या बोर्डे कुटुंब यांच्याकडे आहे
 घोडी वर बाबा म्हणजेच जाधव बाबा असतात त्यांच्या सांग आजूबाजूला धनवटे डोखे,खरपास असे लोक असतात
बाबा वर असणारी गोल छत्री धनवटे हे फिरवतात
नंतर मग काठ्या असतात त्यात धनवटे ,कळणं,भोईर, भगत, अश्या लोक असतात
 प्रथम रात्री नदी ओलांडून बाप तारा या गावातून होईन धोत्रे या ठिकाणी असतो  त्या वेळी सुमारे २ वा असतात 
सकाळी उठल्यावर गावातील लोकणांकडून चहा पाणी यांची सोया केली जाते
परत प्रथम पुठाच्या दिशेने होते गोधे गाव हुन  तीलवणी या गावात विश्राम घेऊन पुढच्या दिशेने जातात बोकटे शिवार  सुमारे ४/५ च्या दरम्यान गावातील लोकांनां कडून बाबा साठी  साज आणला जोते  यानंतर बाबा चे विधी होऊन स्वारी मार्गस्थ होते बोकटे येथील मंदिरात स्वारी थंड होते  नंतर पुठाच्या दिवशी आपल्या गावी प्रस्थान होते
गावात येताच गावातील लोकांकडून आनंद साजरा केला जातो

रात्री गावातील यात्रा महोत्सव साजरा केला जातो त्यात ९ वाजता घोडी व बाबाचा साज घेऊन वाजत गाजत नेला जातो ते मारुती मंदिर धनवटे गली येथे
१० फटाके च्या अतिष बाजीने दफकरी सुरत काठ्या कवड्या एक जणू सुबदर प्रसंग अनुभवायला मिळते
ती स्वारी गावात श्रे ।कल भैरव नाथ मंदिर शांत होते त्या दरम्यान गावातील लोक रेवडी ची उधळण करतात
 जातात त्याठिकाणी
 स्वारी असे या यात्रेला संभोधले जाते विडिओ आपल्यास  बघण्यासाठी मिलेलं गावचे कुलदैवत म्हणूल श्री कल भैरव महाराज यांची ओळख आहे
मी लहान पण पासून या सर्व गोष्टी मोठ्या लोकांकडून  माझे बाबा   कडून माहिती मिळवली व मला जी काही थोडी फार माहिती मिळली ती मी आपल्या समोर मंडळी आहे
या

गावातील काही छायाचित्रे



गावातील श्री काळ भैरव नाथ मंदिर  श्री काळ भैरवनाथ मंदिर पुणतांबा 







 चक्रधर स्वामी मंदिर,
सुमारे २१ दिवस श्री चक्रधर स्वामी यांनी पुणतांबा परिसर वस्थाव केले आहे 

संत गंगागीर महाराज मंदिर
असे गावात जवळपास ४००पेक्षा जास्त पुरातन मंदिरे आहेत. संत साईबाबा व संत जनार्दन स्वामी यांचे काही वर्षे पुणतांब्यात वास्तव होते. पेशवाईच्या काळात या गावाला वैभव प्राप्त झाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी गोदातीरी घाट व मंदिराची उभारणी करून गावाला धार्मिक वैभव प्राप्त करून दिले. आजही हे घाट व मंदिर सुस्थितीत आहे.

भगवान शिवशंकराकडून वरदान मिळवून त्रैलोक्याला सळो की पळो करून सोडणाऱ्या त्रिपुरासुराचा वध कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला झाला. भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध करून त्रैलोक्याला त्याच्या जाचातून मुक्त केले. म्हणून तेव्हा मोठा विजयोत्सव साजरा करण्यात आला. भगवान शिवशंकराच्या विजयाची स्मृती म्हणून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाऊ लागली. त्याच दिवशी कार्तिकेयाचा जन्म झाला. म्हणून कार्तिकेयाचीही पूजा केली जाऊ लागली. पुणतांबेगावी पुरातनकालीन कार्तिकेय मंदिर आहे. त्या मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेला कृत्तिका महोत्सव साजरा केला जातो. मंदिरासमोर त्रिपूर पेटवून प्रवाहीत केले जातात. कार्तिकी (त्रिपुरारी) पौर्णिमेला मंदिरात जप-तप साधना केल्यास साधकाला फलप्राप्ती होते. त्यादिवशी मध्यरात्री नदीचे पाणी दुधासारखे पांढरे स्वच्छ होते व कार्तिकेय स्वामी त्यावेळी नदीत स्नानासाठी येतात अशी आख्यायिका आहे. मंदिरात स्त्रियांना प्रवेश वर्ज्य आहे. मात्र त्रिपुरारी पौर्णिमा व कृतिका नक्षत्रांवर महिलांना मंदिरात प्रवेश मिळतो व कार्तिकेय स्वामींचे दर्शन घेता येते. कार्तिकस्वामींना नारळ, मोरपीस, रूद्राक्ष, सोने, पिवळे जानवे, तीळ, मूग वाहून प्रसन्न केले जाते. कृत्तिका नक्षत्रावर मंदिरात होणाऱ्या कृत्तिका महोत्सवास लाखो भाविक कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा लाभ घेतात.

कार्तिक स्वामी मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला. घडीव व कोरीव दगडाचे काम असलेल्या त्या मंदिराचा कळस पन्नास फूट उंचीचा आहे. मंदिरासमोर सभामंडप आहे. मंदिरात मध्यभागी शंकराची पिंड असून मंदिरामध्ये दक्षिणमुखी कार्तिकस्वामींची मूर्ती, उत्तरेस गणपती तर पश्चिमेस पार्वती व गंगामातेची मूर्ती आहे. मंदिराबाहेर रावणाची मूर्ती आहे तर मंदिराच्या चारही बाजूंला भगवान शंकराचे गण व मंदिराच्या उजव्या बाजूंला नवग्रहांचे मंदिर आहे.
ज्ञयासेनी देवि मंदिर 
सुदर आशा वातावरणात हे देवी चे मंदिर आहार 


पुणतांबा गावाच्या पश्चिमेला गोदातीरी चारशे वर्षांपूर्वींचे मंदिर आहे. मंदिरात स्वयंभू देवीमूर्ती आहे. ती देवी नगर जिल्ह्यासमवेतच खानदेशातील भाविकांची कुलदेवता मानली जाते. इसवी सनपूर्व काळात तेथे चंद्रसेन नावाचा राजा राज्य करत होता. त्या राजाच्या मुलाला जलोदर हा पोटाचा आजार झाला. त्याच्यावर अनेक उपचार करण्यात आले, पण आजार बरा होईना. त्यावर उपाय म्हणून गावाच्या कडेला यज्ञ करून त्यात एका बालकाचा बळी द्यावा, त्यामुळे आजार बरा होईल असे सांगण्यात आले. राजाने यज्ञाची तयारी केली पण बळी देण्यासाठी मुलगा मिळेना, म्हणून मग दवंडी देण्यात आली. तेव्हा शेजारी असलेल्या पुरणगावातील मुद्गल गोऱ्हे नामक मुलगा घरची हलाखीची परिस्थिती ध्यानी घेऊन बळी जाण्यास तयार झाला. धार्मिक विधीनंतर मुलास यज्ञात टाकले जात असताना यज्ञकुंडात देवी प्रकट झाली व देवीने त्या मुलास वरचेवर झेलून यज्ञाबाहेर 7 दिले. देवीने बळी जाणाऱ्या मुलाला वर सोडून दिले, त्यामुळे त्या देवीचे नाव यज्ञसेनी असे पडले. राजाचा मुलगा आजारातून मुक्त झाला. पुढे यज्ञातून जीवदान मिळालेल्या मुद्गलाने त्याच गावात आश्रय घेतला. त्याला एकशेचाळीस वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. त्याने देवी मंदिरापासून काही अंतरावर समाधी घेतली. देवी मंदिराशेजारी सुरेख असे मुद्गलेश्वर (मुंजाचे) मंदिर आहे.

गावात आलुतेदार-बलुतेदार पूर्वीपासून गुण्यागोंविदाने राहतात. धनगरवाडा, कुंभारवाडा, बामणवाडा वादारवाडा माळीवाडा  अशा वेगवेगळया आळया आढळतात. काळाच्या ओघात जीवनपध्दती बदलत गेल्यामुळे आळया ( गल्ली) हा प्रकार राहिला नाहइ  आडनावाचे लोक राहतात. गावाची लोकसंख्या २० हजारपेक्षा जास्त असली तरी शहराचे रूप गावाने पाघरले नाही. सका-सकाळी शेताकडे गुरे-ढोरे घेऊन जाणारे पशुपालक- शेतकरी नजरेस पडतात. गावात राष्ट्रीय व शेडयूल बँका आहेत. ख्रिश्चन मिशनऱ्याची रायत शााळा माध्यमिक शाळा  संकुल देखील आहे. सायंकाळी गावात भाजीपाल्याचा बाजार भरतो. भाजी विकण्यासाठी आसपासच्या गावातील शेतकरी पुणतांब्यात येता। 



श्री कार्तिक स्वामी मंदिर परिसरातील हा एक विडिओ

21 comments:

  1. खूपच छान अप्रतिम माहिती मित्रा धन्यवाद

    ReplyDelete
  2. फार छान माझा पुणतांबा

    ReplyDelete
  3. माझ गाव खुप सुंदर

    ReplyDelete
  4. Rare and real information of old puntamba

    ReplyDelete
  5. छान माहिती दिली आहे

    ReplyDelete
  6. खूप छान माहिती दिली आपल्या गावाबद्दल

    ReplyDelete
  7. Really nice information of our Golden Puntamba

    ReplyDelete
  8. माझ माहेर माझ्या समोर उभ केलस तु .28 वर्षांपूर्वी चा प्रत्येक क्षण मी पुन्हा अनुभव ला.Thanks a lot

    ReplyDelete
  9. Khupach chhan! Akash bhawa... Kal Bhairav chi chhoti murti ahe, tichya mage kon basle aahet. Sangu shaktos bhawa...

    ReplyDelete